नाशिक : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांना दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता मिळवता आली पण दिल्लीची सत्ता जाताच त्यांना आपल्या पक्षातले राज्यसभेचे 7 खासदारच टिकवता आले नाहीत, तर आम आदमी पार्टीची लिबरल गॅंग सुद्धा पक्षात टिकवून ठेवता आली नाही!! हा इतिहास गेल्या 10 वर्षांमध्ये घडला.Liberal gang left aam aadami party before
अरविंद केजरीवालांना त्यांच्या राजकीय इतिहासात अनेक लिबरल तरुणांनी साथ दिली. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सर्वाधिक राजकीय फायदा अरविंद केजरीवाल यांनाच झाला. हा फायदा मिळवून देण्यात त्यांना त्यावेळच्या राजकारणा बाहेर असलेल्या अनेक लिबरल तरुणांनी भरपूर साथ दिली. पण अरविंद केजरीवाल नंतर स्वतःच सत्तेचा राजकारणामध्ये एवढे वाहून गेले, की त्यांना राज्यसभेचे सात खासदार टिकवून धरता आले नाहीतच, त्याचबरोबर त्यांनी आपल्या साथीला आलेल्या अनेक लिबरल तरुणांची साथ सुद्धा आधीच गमावली.
– ७ खासदारांनी सोडली आम आदमी पार्टी
राघव चढ्ढा, हरभजन सिंग, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम सहानी या सात राज्यसभा खासदारांनी आज अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी कारणे दिली. पण हे सगळे खासदार मूळात फक्त भाजपने फोडले आणि ते भाजपमध्ये दाखल करून घेतले असे खरंच घडले का??, याचा तटस्थपणे आणि बारकाईने आढावा घेतला तर पत्रकार परिषद घेऊन भाजपला दोष देणे सोपे आहे, पण आपल्याच पक्षाच्या खासदारांना राजकीय कार्यक्रम देऊन ते टिकवून ठेवणे अवघड आहे, हेच राजकीय वास्तव समोर येईल.
– पक्ष फुटण्याची प्रक्रिया आधीपासूनच
भाजपने आम आदमी पार्टी फुटण्यासाठी आतून फूस लावली, हे म्हणणे ठीक आहे आणि कदाचित वास्तवाला सुद्धा धरून आहे पण स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहालामध्ये नेऊन मारहाण करायला भाजपने सांगितले नव्हते. केजरीवालांच्या शीशमहालात स्वाती मालीवाल यांना महाराणी झाली. ते प्रकरण बरेच गाजले. त्यावेळी केजरीवाल यांनी स्वाती मालीवाल यांची माफी मागितली नाही किंवा त्यांना पक्षात टिकवून धरण्याचे प्रयत्न सुद्धा केले नाहीत.
– फक्त भाजपला दोष देऊन कसे चालेल??
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे स्वाती मालीवाल यांच्या बाबतीत केले, तेच कमी अधिक फरकाने इतर खासदारांच्या बाबतीत केले. राघव चढ्ढा, संदीप पाठक यांना तुम्ही पार्टीने राष्ट्रीय प्रवक्ते केले, पण त्यापलीकडे आम आदमी पार्टीच्या महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत त्यांना सामील केले, असे घडले नाही. अशोक मित्तल यांच्यावर घरावर ईडीचे छापे पडले, त्यावेळी त्यांना आम आदमी पार्टीने दूर सारले. अरविंद केजरीवाल यांनी बाकीच्या खासदारांना फारशी वेगळी वागणूक दिली नव्हती. त्यामुळे ते खासदार फुटून भाजपमध्ये निघून गेले तर फक्त भाजप किंवा फुटलेल्या खासदारांना दोष देऊन कसे चालेल??, हा खरा सवाल आहे.
– 2015 पासूनच पक्षाला गळती
पण अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत फक्त ७ खासदारांनी सोडून दिले असे नाही, तर त्याआधी लिबरल गॅंगने सुद्धा त्यांची साथ सोडून दिली होती. केजरीवालांनी 2015 मध्ये प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षातून हाकलून दिले. 2017 मध्ये कुमार विश्वास आणि कपिल मिश्रा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. 2018 मध्ये आशुतोष आणि 2019 मध्ये अलका लांबा यांनी आम आदमी पार्टी सोडली. 2024 मध्ये स्वाती मालीवाल यांना शीश महालात मारहाण झाली.
– केजरीवालांचे वजाबाकीचे राजकारण
अरविंद केजरीवालांचे हे सगळे वजाबाकीचे राजकारण होते. याच दरम्यान त्यांना पंजाब मध्ये सत्ता मिळाली, पण दिल्लीची सत्ता गमवावी लागली. तरीसुद्धा अरविंद केजरीवाल यांची राजकीय वर्तणूक बदलली नाही. त्यांनी कधी बेरजेचे राजकारण केले नाही उलट वजाबाकीचे राजकारण सुद्धा रोखून धरले नाही. त्यामुळेच आज ७ खासदार फुटलेले पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्या पलीकडे जाऊन पंजाब मधले पन्नास आमदार पक्षातून फुटण्याची भीती निर्माण झाली त्यांना हा इशारा भाजपने दिला नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिला म्हणजेच अरविंद केजरीवालांच्या राजकीय जखमेवर भाजप पेक्षा काँग्रेसने खोलवर मीठ चोळले.
Liberal gang left aam aadami party before
महत्वाच्या बातम्या
- बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!
- राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना टोला, पण सुप्रिया सुळेंचा ममतांना पाठिंबा!!
- बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशीच तीन पवारांच्या तोंडी तीन वेगवेगळ्या भाषा; राजकीय मतभेदांना फुटल्या वाटा!!
- अजित पवारांचा घातपात ते बारामतीत पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!