Kejriwal : कॅग रिपोर्टमध्ये केजरीवालांची पोलखोल : ‘आप’च्या मोहल्ला क्लिनिकमध्ये 70 % रुग्णांची केवळ मिनिटात तपासणी

Kejriwal

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Kejriwal दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ( Rekha Gupta ) यांनी शुक्रवारी आरोग्यसेवेशी संबंधित महालेखापाल (कॅग) यांचा अहवाल विधानसभेत मांडला. पूर्वाश्रमीच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या कार्यकाळात रुग्णालयात गरजेची औषधी, सुविधांचा तुटवडा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, उपकरणांचा तुटवडा आणि निधीचा वापर झाला नसल्याने दिल्लीच्या आरोग्यसेवेचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. मोहल्ला क्लिनिकमधील त्रुटीही निदर्शनास आल्या आहेत.Kejriwal

आप सरकार कोरोना व्यवस्थापनात अपयशी ठरले. एवढेच नव्हे तर केंद्राने जारी केलेल्या ७८७.९१ कोटी रुपयांपैकी केवळ ५८२.८४ कोटी खर्च करण्यात आले. ७४ मोहल्ला क्लिनिकपैकी एकाही दवाखान्यात आवश्यक १६५ आैषधींचा साठा नव्हता. ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर, एक्स-रे व्ह्युअर, थर्मामीटर, रक्तदाब तपासणीचा मॉनिटरसारखी अत्यावश्यक उपकरणेही कमी होती.



४७ टक्के औषधी बाहेरून घ्यावी लागत होती

रुग्णालयातील ३३ ते ४७ टक्के औषधी बाहेरील मेडिकल दुकानातून खरेदी करावी लागत होती. शासकीय रुग्णालयातील इर्मजन्सी सेवा अपुरी होती. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ऑपरेशन थिएटर बंद होते.

दिल्ली सरकारच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १० हजार नव्या खाटा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. केवळ १,३५७ खाटा मिळाल्या. ८ नव्या रुग्णालयांपैकी फक्त ३ पूर्ण होऊ शकले. काही योजना ८ वर्षांपर्यंत लांबल्या.

Kejriwal exposed in CAG report: 70% of patients examined in AAP’s Mohalla clinic in just a minute

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात