दिल में काबा, नजर में मदिना; दुर्गा पूजेच्या मांडवात ममता बॅनर्जींची चाटूकारिता!!

Mamata Banerjee

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : दिल में काबा, नजर में मदिना; दुर्गा पूजेच्या मांडवात ममता बॅनर्जींची चाटूकारिता!!, असला प्रकार पश्चिम बंगाल मधून एका व्हिडिओतून समोर आला.Kaaba in heart, Medina in sight; Mamata Banerjee’s flattery in Durga Puja Mandwa!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगाल मधल्या मुस्लिम मतांवर निवडून येते आणि ते टिकून राहते हे काही नवीन नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी वाटेल त्या स्तरावर खाली उतरतात. अधून मधून त्या हिंदू होऊन मठ मंदिरांमध्ये जातात. तिथल्या घंटा वाजवतात. पण त्यावर राजकीय उतारा म्हणून तिच्या लगेच फुर्फुरा शरीफला सुद्धा जाऊन येतात, हे आत्तापर्यंत अनेकदा दिसले.



पण 2025 च्या दुर्गा पूजेत ममता बॅनर्जींच्या मुस्लिम प्रेमाचा कहर झाला. त्यांनी ठिकठिकाणी दुर्गा पूजेच्या मंडपांना भेटी दिल्या तिथे जाऊन पूजा केल्या. पण भवानीपूरच्या दुर्गा पुजा मंडपात ममता बॅनर्जी दिल में काबा, नजर में मदिना या गाण्यावर टाळ्या वाजवून ठेका धरला. भर दुर्गा पूजेच्या मंडपात गायक मदन मित्राने ममता बॅनर्जी यांच्यासमोर दिल में काबा, नजर में मदिना हे गाणे गायले त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी त्या गाण्यावर टाळ्या वाजवून ठेका धरला. सनातन हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असणाऱ्या दुर्गा पूजेच्या मंडपात मुस्लिम प्रेमाचे असले गाणे म्हणू नये याचे साधे भानही त्यांना राहिले नाही.

या आधी देखील ममता बॅनर्जी यांनी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धांना धक्का लावला. त्यांनी मुद्दामून पितृपक्षात दुर्गापूजा मंडपाचे उद्घाटन केले होते. त्यापाठोपाठ दुर्गा पूजेच्या मंडपात त्यांनी दिल में काबा, नजर में मदिना या गाण्यावर टाळ्या वाजवून ठेका धरला.

Kaaba in heart, Medina in sight; Mamata Banerjee’s flattery in Durga Puja Mandwa!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात