जेपी नड्डांनी ट्वीटरवर शेअर केले कार्यकर्त्याचे भावनिक पत्र, ‘मन की बात’विषयी व्यक्त केल्या भावना

JP Nadda tweet, BJP workers should gather at a workers house every month and listen Mann Ki Baat

JP Nadda Tweet : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका कार्यकर्त्याचे पत्र ट्विट केले आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हे पत्र ट्वीट करून लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’संदर्भात मला अनेक पत्रे मिळत आहेत. नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, घरातील वडीलधाऱ्यांशी मनमोकळी चर्चा झाल्यासारखे घराघरात ‘मन की बात’ ऐकली जाते. JP Nadda tweet, BJP workers should gather at a workers house every month and listen Mann Ki Baat


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका कार्यकर्त्याचे पत्र ट्विट केले आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हे पत्र ट्वीट करून लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’संदर्भात मला अनेक पत्रे मिळत आहेत. नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, घरातील वडीलधाऱ्यांशी मनमोकळी चर्चा झाल्यासारखे घराघरात ‘मन की बात’ ऐकली जाते.

नड्डांनी लिहिले की, बांदाच्या आनंद स्वरूप यांच्याकडून खूप भावनिक पत्र प्राप्त झाले आहे. त्यांनी (आनंद स्वरूप) आपल्या पत्रात अनेक प्रशंसनीय सूचना दिल्या आहेत. जेपी नड्डा यांनी बांदाचे आनंद स्वरूप द्विवेदी यांचे पत्र ट्वीट करून भाजप कार्यकर्त्यांना दरमहा त्यांच्या बूथच्या सहकाऱ्यांच्या घरी जमून ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या बूथच्या सर्व साथीदारांसह दरमहा ‘मन की बात’ ऐकावे व तेथील बूथच्या बैठकीचे आयोजन करावे, अशी मी विनंती करतो. पुढे त्यांनी लिहिले आहे की, पुढच्या महिन्यात मन की बात इतर कार्यकर्त्याच्या घरी ऐका.

महत्त्वाचे म्हणजे मन की बात हा पंतप्रधान मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. सन 2014 मध्ये सुरू झालेल्या या रेडिओ कार्यक्रमाचे आतापर्यंत 75 भाग प्रसारित झाले आहेत.

JP Nadda tweet, BJP workers should gather at a workers house every month and listen Mann Ki Baat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात