जपानचे संरक्षण मंत्री भारतात आणि त्याचवेळी दुसऱ्या जपानी नेत्याच्या हातूनच भारताचा पाकिस्तानवर economic strike!!

economic strike!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हे आज भारत दौऱ्यावर आले असून नेमका त्याच वेळी दुसऱ्या जपानी नेत्याच्या हातून भारताने पाकिस्तानवर आजच economic strike केला. हा योगायोग वरवरचा वाटत असला तरी तो भारतीय नेतृत्वाने तो कौशल्याने घडवून आणला आहे.Japan’s Defense Minister is in India

पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हे आज भारत दौऱ्यावर आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. भारताने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात जपान भारताच्या पाठीशी उभा राहिल्याची खात्री जनरल नाकातानी यांनी दिली. दोन्ही संरक्षण मंत्र्यांमध्ये संरक्षण विषयक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीविषयी विशेष चर्चा झाली.



त्याचवेळी इटलीच्या मिलान शहरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात ADB बँकेच्या अध्यक्षांची भेट घेतली. ADB बँकेने पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला आर्थिक मदत करू नये. त्याच्या पॅकेजमध्ये घट करावी, अशी आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे सध्या ADB बँकेचे अध्यक्षपद जपानच्याच एका दुसऱ्या नेत्याकडे आहे. मसातो कांडा असे त्यांचे नाव असून ते जपानच्या अर्थ मंत्रालयात उपमंत्री होते. त्यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजीच ADB बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मसातो कांडा यांची भेट घेऊन पाकिस्तानच्या आर्थिक पॅकेज मध्ये घट करण्याची मागणी केली.

त्याचवेळी दोन्ही नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेवर चर्चा झाली. या संकल्पनेतल्या योजनांमध्ये ADB बँक भारताला निश्चित मदत करेल, अशी ग्वाही मसा तो कांडा यांनी निर्मला सीतारामन यांना दिली.

Japan’s Defense Minister is in India and at the same time India’s economic strike on Pakistan is carried out by another Japanese leader!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात