गुगलवर क्लाऊडवर फोटो टाकून मोबाईलमधील स्पेस वाचविण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, आता गुगल क्लाऊड स्टोअरेजच्या सुविधेसाठी पैसे आकारणार आहे. 15 जीबी पेक्षा अतिरिक्त डेटा हवा असेल तर आता दरमहा 1.99 डॉलर (146 रुपये)भरावे लागणार आहेत.It costs to put photos in the cloud on Google
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुगलवर क्लाऊडवर फोटो टाकून मोबाईलमधील स्पेस वाचविण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, आता गुगल क्लाऊड स्टोअरेजच्या सुविधेसाठी पैसे आकारणार आहे.
15 जीबी पेक्षा अतिरिक्त डेटा हवा असेल तर आता दरमहा 1.99 डॉलर (146 रुपये)भरावे लागणार आहेत.गुगल एक जूनपासून आपली विनामूल्य सेवा बंद करणार आहे.
गुगलकडून गुगल फोटो विनामूल्य क्वाऊड स्टोरेजची सुविधा 1 जून 2021 पासून बंद करीत आहे. गुगल ड्राईव्ह किंवा इतर कोणत्याही जागी आपले फोटो आणि डेटा स्टोअर करत असाल तर यासाठी शुल्क द्यावे लागेल.
सध्या गुगलकडून युजसंर्ना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही अॅक्सेस करू शकतील.
मात्र, 1 जून 2021 पासून युजसंर्ना गुगलकडून केवळ 15 जीबी विनामूल्य क्लाऊड स्टोरेजची ऑफर दिली जात आहेत. जर युजर्सना यापेक्षा अधिक फोटो किंवा डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोअर करायची असतील तर त्यांना शुल्क भरावे लागेल.
कंपनीच्या वतीने यास गुगल वन असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे वार्षिक शुल्क 19.99 डॉलर (सुमारे 1464 रुपये) आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App