विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : अल्ला हू अकबरचा नारा देणारी मुस्कान खान आणि हिजाब वादातील पडद्यामागील हातांची चौकशी करा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.Investigate the behind-the-scenes hands of Muskan Khan and Hijab controversy chanting the slogan of Allah Hu Akbar, Anant Kumar Hegde’s demand to CM
अल-कायदा संघटनेचा प्रमुख प्रमुख अयमान अल जवाहिरी याने मुस्कान खानचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हेगडे यांनी म्हटले आहे की, मुस्कानचे कृत्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातमी बनले. अनेक मुस्लिम संघटनांनी तिला पुरस्कृत केले आहे. त्यामुळे या संपूर्ण हिजाब वादामागे पडद्यामागील हाता आहेत.
उच्च न्यायालयानेही हिजाब वादातील निकालात हिजाब घालून वर्गात बसू देण्याच्या मागणीमागे कोणीतरी ‘मास्टरमाइंड ’ असल्याचे म्हटल होते. त्यामुळे यामागे निश्चितच काही पडद्यामागील हात आहेत. त्यामुळे मुस्कान आणि या लोकांच्यातील चौकशी करण्याची विनंती केली आहे.
आपण हेगडे यांच्याशी या संदर्भात बोलू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यांच्याकडे असलेली या संदर्भातील माहिती घेण्यात येईल. त्याआधारे आम्ही आवश्यक ती कारवाई करू असे ते म्हणाले.गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले की, सरकारने हा मुद्दा गंभीरपणे घेतला आहे.
तपासाबाबत संपूर्ण माहिती देऊ शकत नाही कारण हे प्रकरण साधे नाही. जवाहिरी हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. जर तो आमच्या कर्नाटकी मुलीबद्दल बोलला असेल तर आम्ही ते गांभिर्याने घेतले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App