सर्वात स्वस्त डेटा खर्च (भारत) आणि सर्वात महाग (मलावी) डेटाची किंमत यामध्ये 30,000% फरक आहे.INTERNET COST: Cheapest data in India! Public says- if it is Modi then it is possible! See the top 5 countries with the cheapest mobile data
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध पर्यावरणवादी एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांनी शनिवारी ट्विटरवर भारत आणि इतर देशांच्या इंटरनेट डेटावरील खर्चाची तुलना करताना सांगितले की, भारतात डेटावरील खर्च खूपच कमी आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकर्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
Cost of 1GB of mobile data: India 🇮🇳: $0.09 (lowest)Israel 🇮🇱: $0.11 United States 🇺🇸: $8Canada 🇨🇦: $12.55 pic.twitter.com/tgb0fSNmgD — Erik Solheim (@ErikSolheim) January 22, 2022
Cost of 1GB of mobile data:
India 🇮🇳: $0.09 (lowest)Israel 🇮🇱: $0.11
United States 🇺🇸: $8Canada 🇨🇦: $12.55 pic.twitter.com/tgb0fSNmgD
— Erik Solheim (@ErikSolheim) January 22, 2022
भारतात 1 जीबी डेटासाठी (cost of 1 GB data) फक्त 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये) शुल्क आकारले जाते, जो सर्वात कमी डेटा खर्च आहे.
इस्रायलमध्ये 1 GB डेटासाठी 0.11 डॉलर आकारले जाते, जे 8.19 रुपयांच्या बरोबर आहे. त्याच वेळी, यूएस आणि कॅनडामध्ये 1 जीबी डेटाची किंमत अनुक्रमे 8 डॉलर (जवळपास 595 रुपये) आणि 12.55 डॉलर (जवळपास 933 रुपये) आहे.
चौकट
सर्वात महाग मोबाइल डेटा असलेले टॉप 3 देश मलावी – 27.41 डॉलर (जवळपास 2039 रुपये) बेनिन – 27.22 डॉलर (जवळपास 2025 रुपये) चाड – 23.33 डॉलर (जवळपास 1736 रुपये)
एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटसह एक इमेज ग्राफ शेअर केला आहे ज्यामध्ये विविध देशांचा डेटा खर्च सांगितला आहे. इटलीमध्ये डेटाची किंमत 0.43 डॉलर प्रति जीबी आहे, म्हणजेच तेथील नागरिक 1 जीबी डेटासाठी 32 रुपये खर्च करतात.
ग्रीसमध्ये 1 GB डेटासाठी 12.06 डॉलर (जवळपास 897 रुपये) आकारले जातात, तर दक्षिण कोरियामध्ये 10.94 डॉलर (जवळपास 814 रुपये) आकारले जातात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App