• Download App
    घडलंय बिघडलंय, बहिण भावामध्ये बिनसलंय!!; वाचा नेमकं कसं घडलंय?? Internal fight between rahul and priyanka gandhi now in open for grip over Congress organization

    घडलंय बिघडलंय, बहिण भावामध्ये बिनसलंय!!; वाचा नेमकं कसं घडलंय??

    घडलंय बिघडलंय, बहीण भावामध्ये बिनसलंय!! असे काँग्रेसमध्ये घडत आहे. आत्तापर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या पक्षांतर्गत सत्तासंघर्ष “बाहेर” येऊ लागलाय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आता फारसे राजकीय सख्ख्य उरले नसल्याचे चित्र दिसायला लागला आहे. Internal fight between rahul and priyanka gandhi now in open for grip over Congress organization

    तसेही काँग्रेसमध्ये मूळातच संघटनात्मक पातळीवर सोनिया गांधींनी निर्णय घेऊन प्रियांका गांधी यांच्या ऐवजी राहुल गांधींना पुढे चाल दिली, याला आता 10 वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. प्रियांका गांधी यांच्यातले नेतृत्व गुण आणि त्यांचे इंदिरा गांधींशी असलेले साम्य लक्षात येऊनही सोनिया गांधींनी काँग्रेसवर पूर्णपणे आपली पकड असताना जाणीवपूर्वक तो निर्णय घेतला होता. राहुल गांधींना पक्षाच्या अध्यक्षपदी नेमले, जेणेकरून ते विशिष्ट मुदतीत आपला राजकीय परफॉर्मन्स सिद्ध करून पक्षावर मजबूत पकड ठेवतील!! अर्थात सोनिया गांधींनी त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवली होती.

    त्याचवेळी प्रियांका गांधी यांचा उपयोग प्रचारापुरता आणि राहुल गांधींपेक्षाही दोन – तीन स्तर खाली म्हणजे पक्षाच्या सरचिटणीस आणि एखाद्या प्रदेशाची जबाबदारी, एवढ्या पूरताच मर्यादित ठेवला. पण 2004 मध्ये वाजपेयींसारख्या मुरब्बी नेत्याला चकवून काँग्रेसला विजयी करू शकलेल्या सोनिया गांधींचा आपल्या मुलाबाबतचा राजकीय होरा मात्र चुकला.

    राहुल गांधींना अपेक्षेबर हुकूम राजकीय परफॉर्मन्स दाखवताच आला नाही आणि या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांची चमक अधिक दिसेल यातला धोका लक्षात घेऊन त्यांची राजकीय गाडी मुळातच साईडिंगच्याच रुळावर ठेवण्यात आली.

    राहुल गांधींनी आत्तापर्यंत सांभाळलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रियांका गांधींना आत्तापर्यंत देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या यांच्याकडे एक नजर टाकली तरी, ही बाब अधिक स्पष्ट होईल.

    राहुल गांधींनी छत्तीसगड वगळता बाकी कोणत्याही निवडणुकीची स्वतंत्र जबाबदारी घेतल्याचे आढळत नाही. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांनी 2019 नंतर काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले नाही. अडीच वर्षे त्यासाठी काँग्रेसचे नेते झगडत राहिले. पण राहुल गांधींनी “जबाबदारी” स्वीकारली नाही. ही “ॲथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलीटी” अशी प्रवृत्ती आहे.

    त्या उलट प्रियांका गांधींना मूळातच अवघड अशा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांची जबाबदारी सोपवली. जिथे त्यांचा परफॉर्मन्स कितीही उंचावला, तरी पक्ष संघटना एवढी कमकुवत की तिथे प्रियांका गांधींची चमकच मूळात दिसू नये, अशी “व्यवस्था” करण्यात आली.

    तू फक्त लढ, निर्णय आम्ही घेतो!!

    त्यातही राज्याच्या संघटनात्मक जबाबदारीपेक्षा प्रियांका गांधींना कायम प्रचारात्मक पातळीच्या जबाबदाऱ्या सोपविणे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी इष्ट ठरविले. उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवताना त्यांना आघाडी अथवा युती करण्याचे अधिकार राहुल आणि सोनिया गांधींनी दिले नाहीत. अन्यथा समाजवादी पार्टी अथवा बहुजन समाज पार्टी यांच्याशी युती करून प्रियांका गांधींना काँग्रेसचा परफॉर्मन्स सध्यापेक्षा थोडा तरी उंचावता आला असता. पण ते घडू दिले नाही.

    प्रियांका गांधींचा “लडकी हूं लढ सकती हूं” हा कार्यक्रम हा कार्यक्रम युवती काँग्रेस पुरता मर्यादित ठेवला. त्यामुळे त्याच्या संघटनात्मक पातळीची जबाबदारी मूळ काँग्रेस संघटनेवर आलीच नाही. अर्थातच तो कार्यक्रम अपेक्षे बरहुकूम यशस्वी ठरू शकला नाही.

    राहुल गांधींचा राजकीय परफॉर्मन्स त्यांचे दोनदा रीलॉन्चिंग करूनही उंचावत नाही हे पाहता प्रियांकांचा ऑप्शन पुढे करणे हे सोनिया गांधींना शक्य होते. पण नेमकी त्याच वेळी सोनिया गांधींची तब्येत आणि त्यांच्या रिटायरमेंटची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू करण्यात आली. दिल्ली कायमची सोडून त्या प्रियांका गांधींच्या शिमल्यातल्या बंगल्यात राहायला जाणार असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या.

    या बातम्या सहज साध्या नव्हत्या. यामध्ये सोनिया गांधींच्या रिटायरमेंट पेक्षा त्यांच्या मनात उद्भवणारा प्रियांका गांधींच्या लॉन्चिंगचा विषय थांबविण्याच्या त्या बातम्या होत्या.

    काश्मीरमध्ये जाऊ आपण खेळू या बर्फ

    राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एरवी बहिण भावांचे नाते आपण कसे जपतो त्यातून भारतीय संस्कृतीला कसा पुढावा देतो, याचा व्यवस्थित देखावा करतात. भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा संपल्यानंतर राहुल गांधींनी काश्मीरचा सुट्टी दौरा केला होता त्यावेळी ते आवर्जून प्रियांका गांधींना तिकडे घेऊन गेले. तिथे ही दोन्ही बहीण भावंडे बर्फ खेळली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. पण त्यापलीकडे काही घडले नाही.

    “इंडिया” आघाडीतून उघडले

    त्यानंतर “इंडिया” आघाडीची चर्चा खुद्द सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन सुरू केली म्हणून आघाडीच्या तीन तरी बैठका यशस्वी होऊ शकल्या. त्यात राहुल गांधी बिलकुलच पुढाकार असलेले नेते नव्हते, तर त्या सोनिया गांधी होत्या आणि प्रियांका गांधींना यापैकी एकाही बैठकीला साधे निमंत्रण नव्हते.

    शरद पवार सुप्रिया सुळेंना घेऊन त्या बैठकांना उपस्थित राहिले. ममता बॅनर्जी अभिषेक बॅनर्जींना घेऊन आल्या होत्या. पण सोनिया आणि राहुल गांधींनी प्रियांका गांधींना त्या बैठकांना आणले नव्हते ही बाब आतापर्यंत नजरेआड होती, ती आता “उघड” झाली आहे. राहुल गांधींचे मोदींविरोधातले री लॉन्चिंग कितीही फसो अथवा यशस्वी होवो, प्रियांकांना संधी नाही हेच यातून अधोरेखित होत आहे.

    संसदीय कारकीर्दीला पहिलाच फाऊल

    2019 मध्ये अमेठीतून धोक्यात आल्याचे पाहून राहुल गांधी त्याचवेळी स्वतःसाठी वायनाडची निवड करू शकले, पण प्रियांकांची निवडणूक लढवण्याची चर्चा मात्र सर्वात अवघड असलेल्या वाराणसी मतदारसंघातूनच सुरू करण्यात आली. याचा अर्थ प्रियांका गांधींची संसदीय कारकीर्द सुरूच व्हायची असेल तर त्याच्या पहिल्याच प्रयत्नांना फाऊल करण्याचा हा प्रयत्न!! यातच घडलंय बिघडलंय आणि बहिण भावामध्ये बिनसलंय!!, हे स्पष्ट होते.

    Internal fight between rahul and priyanka gandhi now in open for grip over Congress organization

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स