भारताचा विकास दर 2024-25 मध्ये 7 टक्के राहण्याचा अंदाज!

Indias growth rate predicted to be 7 percent in 2024 25

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे दावोसमध्ये वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत शक्तीकांत दास यांनी भारताच्या आर्थिक विकासाविषयी सांगितले. पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दराने वाढू शकते, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले. याशिवाय, महागाई मध्यम पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. Indias growth rate predicted to be 7 percent in 2024 25

अलिकडच्या वर्षांत सरकारने केलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मध्यम आणि दीर्घकालीन विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत, असे दास यांनी म्हटले आहे. आव्हानात्मक जागतिक समष्टि आर्थिक वातावरणात, भारत विकास आणि स्थिरतेचे उदाहरण प्रस्थापित करत आहे. जागतिक आर्थिक आघाडीवर, महागाई कमी झाली आहे, परंतु विकास दर कमीच आहे, असे त्यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत आयोजित ‘हाय ग्रोथ, लो रिस्क इंडिया स्टोरी’ या विषयावरील सीआयआय सत्रात सांगितले.

कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रगती होण्याची शक्यता असल्याचे दास यांनी म्हटले असून बाजारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय जोखीम आणि हवामान धोके कायम आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.२ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

Indias growth rate predicted to be 7 percent in 2024 25

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात