Shubman Gill : भारतीय कसोटी संघाची घोषणा, शुभमन गिलकडे कर्णधारपद; करुण नायरचे पुनरागमन

Shubman Gill

ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :Shubman Gill रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. २० जूनपासून इंग्लंड दौऱ्याने त्याची सुरुवात होईल. बीसीसीआयने शनिवारी कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. शुभमन गिलला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.Shubman Gill



भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीची सुरुवात एका तरुण संघासह करेल. कर्णधार रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीनंतर, युवा फलंदाज शुभमन गिलला नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहलीची जागा घेण्यासाठी साई सुदर्शनची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोनच अनुभवी खेळाडू आहेत. याशिवाय करुण नायर आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

Indian Test team announced Shubman Gill to captain Karun Nair returns

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात