विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्व त विकासाची उद्दीष्ट्ये गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ क्रमांकावर गेले आहे.India on 117 th position in sustainable development
एकूण १०० पैकी भारताचे ६१.९ गुणांक आहेत. भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या चार आशियाई देशांचे स्थान भारताच्या आधी आहे. देशांतर्गत विचार करता,
शाश्वात विकासाची उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यात बिहार आणि झारखंड सर्वांत मागे असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि चंडीगड ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश आघाडीवर आहेत. याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.
क आणि अन्न सुरक्षा (एसडीजी २), लिंग समानता (एसडीजी ५) आणि दर्जेदार पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक औद्योगिकीकरण आणि संशोधन (एसडीजी ९) ही उद्दीष्ट्ये साध्य करण्यात भारताला फारसे यश न आल्याने स्थान घसरल्याचे अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांना २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी काही निश्चिेत उद्दीष्ट्ये दिली आहेत. जगभरातील सर्व देशांमधील नागरिकांना शांतता आणि समृद्धी मिळवून देणे, हा या मागील उद्देश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App