वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चीनला आज भारताने दणका दिला आहे. त्या अंतर्गत आणखी ५४ अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. India hits China: on 54 more apps Central government to ban on security issues
सीमेवर अकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला यापूर्वी भारताने जशास तसे उत्तर दिले होते. लडाख सीमेवर वाद उकरून काढणाऱ्या चीनच्या अॅप्सवर यापूर्वी बंदी घातली होती. तशीच कारवाई आता करण्यात येत आहे. त्या अंतर्गत देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी अॅप्सवर केंद्र सरकार बंदी घालणार आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सोमवारी सूत्रांच्या हवाल्याने दिली.
५४ अॅप्स हे भारताच्या सुरक्षेला धोकादायक असल्याचा दावा सरकारचा आहे. तसेच या माध्यमातून कुरापतखोर चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची खेळी भारताने केली आहे.
India hits China: on 54 more apps Central government to ban on security issues
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान
- Share Market : सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळून ५७ हजारांच्या खाली, निफ्टी १७ हजारांच्या खाली घसरला
- महाराष्ट्र काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
- गोव्यात मतदान सुरू : मुख्यमंत्री सावंत यांचा दावा – भाजप पुन्हा करणार सरकार स्थापन; उत्पल पर्रीकरांना विजयाचा आत्मविश्वास