वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात एक वेगळेच विधान केले. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी देशात आत्तापर्यंत 2800 किलोमीटर चाललो. पण मला कुठेच नफरत आणि हिंसा दिसली नाही. पण मी न्यूज चॅनेल लावले की नेहमी मला तिथे नफरत आणि हिंसाच पाहायला मिळते. न्यूज चॅनेल यासाठी नफरत आणि हिंसा दाखवतात, की ज्यामुळे देशातल्या जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांपासून बाजूला जावे. जर मूळ मुद्द्यांवर देशात चर्चा सुरू झाली, तर ती सरकारला नको आहे म्हणूनच हे न्यूज चॅनेल नफरत आणि हिंसेवर भर देतात, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. In his speech at Red Fort, Rahul Gandhi said, walked 2800 kilometers
पूरा देश जानता है कि ये नरेंद्र मोदी की सरकार नहीं, अंबानी अडानी की सरकार है। मैं 2,800 किमी चला, मुझे कहीं भी नफरत या हिंसा नहीं दिखी मगर मैं जब भी न्यूज चैनल खोलता हूं तो हमेशा नफरत-हिंसा दिखाई देती है: कांग्रेस सांसद राहुल गांधी, दिल्ली pic.twitter.com/Ow3VIVLeYU — ANI_HindiNews (@AHindinews) December 24, 2022
पूरा देश जानता है कि ये नरेंद्र मोदी की सरकार नहीं, अंबानी अडानी की सरकार है। मैं 2,800 किमी चला, मुझे कहीं भी नफरत या हिंसा नहीं दिखी मगर मैं जब भी न्यूज चैनल खोलता हूं तो हमेशा नफरत-हिंसा दिखाई देती है: कांग्रेस सांसद राहुल गांधी, दिल्ली pic.twitter.com/Ow3VIVLeYU
— ANI_HindiNews (@AHindinews) December 24, 2022
आता हे संपूर्ण देशाला कळून चुकले आहे, की भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार नाही. ते अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे, असे विधान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केले. राहुल गांधींच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. जर राहुल गांधींना 2800 किलोमीटर चालून देशात कुठे नफरत आणि हिंसाच दिसली नाही, तर ते भारत काय जोडणार आणि नफरतीच्या वातावरणात मोहब्बतचे दुकान काय खोलणार??, असा सवाल अनेकांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून केला आहे.
त्याच वेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर आर्थिक धोरणाच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. देशात शेतकरी छोटे उद्योजक आणि छोटे व्यापारीच मोठा रोजगार निर्माण करू शकतात. परंतु नोटबंदीने या छोट्या लोकांचे कंबरडे मोडले. त्यांचे खिसे रिकामे केले आणि मोदींनी त्या पैशाने मोठ्या उद्योगपतींचे खिसे भरले, असे शरसंधान राहुल गांधी यांनी साधले. पण राहुल गांधींच्या देशात मला कुठेही हिंसा आणि नफरत आणि हिंसा दिसली नाही, या वक्तव्याचीच चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App