विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी: Himanta Biswa Sarma आसाममधील धुब्रीतील हनुमान मंदिरासमोर बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी गोमातेचे शीर सापडल्याने आसाममध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “जर मंदिरासमोर बीफ फेकलं जात असेल, तर हिंदूंनी त्याला संतुलित उत्तर म्हणून पोर्क फेकावं,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.Himanta Biswa Sarma
सरमा म्हणाले की, “ही केवळ हिंदू धर्मावर नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक मूल्यांवर हल्ला आहे. जर काँग्रेस म्हणत असेल की हे कृत्य हिंदूंनी केलं, तर मग बीफचं उरलेलं मांस कुठे गेलं? काँग्रेस काय सुचवते आहे की हिंदूंनी ते खाल्लं का? हा आरोप हास्यास्पद आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर पलटवार करत म्हटलं की, “हिंदू कधीही गोमांस फेकणार नाहीत. जर संदेश द्यायचा असेल, तर ते पोर्कच्या माध्यमातून देण्यात आला असता. त्यामुळे काँग्रेसचे आरोप केवळ दिशाभूल करण्यासाठी आहेत.”
धुब्रीतील परिस्थितीवर भाष्य करताना सरमा म्हणाले, “धुब्रीमध्ये एक कट्टर इस्लामी गट कार्यरत आहे, जो बांगलादेशातून मार्गदर्शित केला जातो. ‘नवीन बांग्ला’ नावाची संघटना या गटाच्या मागे असून, त्यांनी मंदिरासमोर दगडफेक केली आणि बांगलादेशात विलीन होण्याचे पोस्टर्सही लावले आहेत.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट आदेश दिले आहेत की, मंदिराविरोधातील किंवा कोणत्याही धार्मिक तेढ वाढवणाऱ्या कृत्यांवर ‘शूट अॅट साइट’ धोरण राबवले जाईल. “अशा प्रकारची विटंबना खपवून घेतली जाणार नाही. आम्ही कायद्याच्या मर्यादेत राहून कठोरात कठोर कारवाई करू. हा भाजपशासित राज्य असून इथे धार्मिक असहिष्णुतेला स्थान नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
या प्रकरणात आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा घटनास्थळी तैनात असून, संपूर्ण तपास गतीने सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरासमोर मांसाचे तुकडे फेकून राज्यात धार्मिक दंगल भडकवण्याचे षड्यंत्र काही कट्टरपंथीय गटांनी रचल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसने मुख्यमंत्री सरमा यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप केला असला, तरी सरमा यांनी उलट काँग्रेसवरच हिंदू समाजाला बदनाम करण्याचा आरोप ठेवत, “या राष्ट्राच्या श्रद्धास्थानांची विटंबना आम्ही कधीच सहन करणार नाही,” असा ठाम इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App