‘मी नसतो तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत तुरुंगात गेले असते’, राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांचा गौप्यस्फोट!


‘लाल डायरी’चा उल्लेख करत मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील टीकेची तीव्रता वाढवत माजी मंत्री राजेंद्र गुढा म्हणाले की, ते नसते तर अशोक गेहलोत तुरुंगात असते, पण त्यांना पदावरून हटवण्यापूर्वी स्पष्टीकरण देण्याची संधीही देण्यात आली नाही. If I was n0t there Chief Minister Ashok Gehlot would have gone to jail’, former Rajasthan minister Rajendra Gudha

झुंझुनू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गुढा म्हणाले, राजेंद्र गुढा नसता तर मुख्यमंत्री तुरुंगात गेले असते. ‘लाल डायरी’चा संदर्भ देत गुढा यांनी दावा केला की, काँग्रेस नेते धर्मेंद्र राठौर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर छाप्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांनी ‘लाल डायरी’ सुरक्षित ठेवली होती.

सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री असलेले गुढा यांना विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्य सरकारला कोंडीत पकडल्यानंतर काही तासांनी शुक्रवारी संध्याकाळी मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी रविवारी झुंझुनू येथे एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राजीनामा देण्यास सांगण्याऐवजी थेट बडतर्फ केल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

गुढा म्हणाले, “तुम्ही (गेहलोत) मला राजीनामा देण्यास सांगितले असते तर मी राजीनामा दिला असता… तुम्ही फोन करून नोटीस द्यायला हवी होती. कारवाई करण्यापूर्वी न्यायाधीशांनाही संधी दिली जाते.’’ गेहलोत यांनी त्यांना सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते अशा लाल रंगाच्या डायरीचा गुढा यांनी अस्पष्टपणे उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ही डायरी सुरक्षित ठेवल्याचे ते म्हणाले. डायरीत काय आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

If I was n0t there Chief Minister Ashok Gehlot would have gone to jail’, former Rajasthan minister Rajendra Gudha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात