वृत्तसंस्था
केप कॅनावेरल : जगप्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या अंतराळ वाहतूक कंपनीने आता मुंग्या, अवाकॅडो आणि यंत्रमानवाचा हात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठविला आहे. नासाच्या अमेरिकेतील केनेडी अंतराळ संशोधन केंद्रावरून ‘फाल्कन’ हे प्रक्षेपक अवकाशात झेपावले. Icecrems for austronauts send at space
‘ड्रॅगन’ या कॅप्सूलमधून मुंग्या, अवाकॅडो आणि यंत्रमानवाचा हात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठविण्यात आला. त्यानंतर, स्पेस एक्सच्या ‘ए शॉर्टफॉल ऑफ ग्रॅव्हिटास’ या नवीन सागरी प्लॅटफॉर्मवर ड्रॅगन या कॅप्सूलला पाठविणारे पहिल्या टप्प्यातील बूस्टर सुखरूप परतले. ‘ड्रॅगन’ या कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुमारे २,१७० किलोचे प्रयोगसाहित्य पाठविण्यात आले आहे. याशिवाय, अवकाश स्थानकातील सात अंतराळवीरांसाठी लिंबू, अवोकॅडो आणि आइस्क्रीमही पाठविले आहे. त्यामुळे, अंतराळवीरांना लिंबू, आईस्कीमची चव चाखता येईल.
द गर्ल स्काऊट्स या संस्थेकडून अंतराळ स्थानकात मुंग्या, वनस्पती आदी पाठवून चाचणी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे, विसकॉन्सिन – मॅडिसन विद्यापीठातील वैज्ञानिक माऊस-इयर क्रेस या जनुकीय संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या वनस्पतीच्या बिया पाठवित आहेत. त्याचप्रमाणे, वजन कमी असल्यास सौर पेशी व इतर साहित्यही अवकाश स्थानकात रवाना केले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App