‘निवडणुका येताच हंगामी हिंदू दिसतात’, राजनाथ सिंह यांचा प्रियांकांचे नाव न घेता टोला!

मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ :  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले. ते म्हणाले- कोणी शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधतात, कोणी त्याला जीवनदाता म्हणून संबोधतात, पण मला कोणी विचारले तर मी म्हणेन की आपल्या देशाचा शेतकरी अन्नदाता आहे, जीवनदाता आहे तसेच या भारताचा भाग्यविधाता आहे. Hungami Hindus appear as soon as the elections come Rajnath Singh without naming Priyanka

कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत संरक्षण मंत्री म्हणाले – काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाच हमीभावांबद्दल बोलत आहे. कमलनाथ सरकार असताना अनेक घोषणा झाल्या पण पहिले आश्वासन पूर्ण झाले नाही. आता पुन्हा हमीभावाची चर्चा आहे.

प्रियांकाचे नाव न घेता साधला निशाणा –

राजनाथ सिंह म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की, तुम्हाला अनेक ‘’हंगामी हिंदू’’ दिसू लागतात. आजकाल कधी बजरंगबली तर कधी माँ नर्मदेची आरती होत आहे. नर्मदेचा आदर तर शिवराज चौहान यांनी केला आहे. त्यांनी मध्यप्रदेश विधानसभेत नर्मदेला living entity रुपात मान्यता  दिली होती.

Hungami Hindus appear as soon as the elections come Rajnath Singh without naming Priyanka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात