• Download App
    मणिपूरमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला; जमावाची घरात तोडफोड; काल मैतेई परिसरातील घरांची जाळपोळ|Human Rights Activist's House Attacked in Manipur; Mob vandalism at home; Houses were set on fire in Maitei area yesterday

    मणिपूरमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला; जमावाची घरात तोडफोड; काल मैतेई परिसरातील घरांची जाळपोळ

    वृत्तसंस्था

    इंफाळ : मणिपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी मानवाधिकार कार्यकर्ते बबलू लिथोंगबम यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली. हल्ल्यावेळी बबलू घरी उपस्थित नव्हते. बबलू स्वत: मैतेई आहेत, परंतु ते मेईतेई लिपुन्स आणि आरामबाई टंगोल या कट्टरवादी संघटनांवर टीका करतात. त्यांनी सीएम बिरेन यांनाही लक्ष्य केले आहे. या कारणामुळे हल्लेखोर त्यांच्यावर चिडले होते.Human Rights Activist’s House Attacked in Manipur; Mob vandalism at home; Houses were set on fire in Maitei area yesterday

    बबलू म्हणाले होते, ‘मला नागरी समाजाच्या गटांकडून माहिती मिळाली आहे की, मैतेई लिपुन्स आणि आरामबाई टेंगोलचे लोक माझ्या घरावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. मात्र, स्थानिक जनता माझ्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे असे होणार नाही. मात्र, आज त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.



    बुधवारी मैतेई परिसरात 2-3 घरांची जाळपोळ

    बुधवारी रात्री उशिरा म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी हल्लेखोरांनी मैतेई परिसरात घुसून दोन-तीन घरांना आग लावली. ही घटना इंफाळ पश्चिममधील कैथेलमांगबी येथील पटसोई पोलीस स्टेशन परिसरात घडली. सर्व हल्लेखोर शस्त्रांनी सज्ज होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अनेक राऊंड गोळीबारही केला. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. यानंतर मैतेई समाजातील महिलांचा समूह घटनास्थळी जमा झाला. सुरक्षा दलांनी महिलांना पुढे जाण्यापासून रोखले आणि शांतता राखण्याचा प्रयत्न केला.

    पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. मात्र, गुरुवारी सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत होते. जुलै महिन्यापासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे.

    Human Rights Activist’s House Attacked in Manipur; Mob vandalism at home; Houses were set on fire in Maitei area yesterday

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट