विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डाॅ. मनमोहनसिंह पंतप्रधान असलेल्या यूपीए सरकारने (संयुक्त पुरोगामी आघाडी) २००४ ते २०१४ या वर्षांत किती जणांची गरीबी हटवली असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. २ फेब्रुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. गंमत म्हणजे, स्वतःच राहुल गांधी यांनी चार वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. त्याहीपेक्षा अधिक गंमतीशीर म्हणजे, त्यांनी या नव्या भाषणातच दोन आकडे सांगितले आहेत. पहिल्यांदा म्हणाले, २३ कोटींची गरीबी हटविली आणि दुसरचाय दमात म्हणाले, २७ कोटींची गरीबी हटविली. How much peoples UPA government really lifted out of poverty? Rahul Gandhi claims four different figures
गरीबी हटवली म्हणजे दारिद्रयरेषेखाली असलेल्या जनतेला दारिद्रयरेषेच्यापलीकडे आणणे. राहुल यांच्याच या दोन आकड्यात तब्बल ४ कोटींचा फरक आहे. यापूर्वीही त्यांनी दोन वेगळे आकडे सांगितले होते. २०१४ दरम्यान ते म्हणाले होते, यूपीएने १४ कोटींना दारिद्रयातून बाहेर काढले. पुढे काही वर्षांनी त्यांनी हाच आकडा १५ कोटींवर नेला. आता तर त्यांनी हे आकडे चक्क जवळपास दुप्पटच केले आहेत. म्हणजे थेट १४ कोटींवरून २७ कोटींपर्यंत. जेव्हा त्यांना भाजप सदस्यांनी लोकसभेत अडवले, तेव्हा ते म्हणाले, हे माझे आकडे नाहीत (सरकारी आकडे आहेत..)
राहुल गांधींनी आकड्यावरून गोंधळ घालणे, हे काही नवे नाही. २०११ नंतर अद्याप जनगणना व आर्थिक-सामाजिक सर्वेक्षण झालेले नसल्याने अधितृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, काही ख्यातप्राप्त संस्था व स्वतः तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंह यांच्या पत्रकार परिषदेच्या आधारे खाली माहिती उपलब्ध आहे…
- यूपीए सरकारने दहा वर्षांत १३.८० कोटी जणांना दारिद्रयरेषेच्याबाहेर काढले आहे.
: डाॅ. मनमोहनसिंह यांची पत्रकार परिषद (३ जानेवारी २०१४) - २००५-०६ ते २०१५-१६ या दहा वर्षांत भारताने २७.३ कोटी जणांना गरीबीच्या दलदलीतून बाहेर काढले. संपूर्ण जगात भारताची कामगिरी जबरदस्त आहे.
: संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेचा जुलै २०१९मधील अहवाल
(या दहापैकी दोन वर्षे मोदी सरकारची आहेत.) - २०१६ ते २०१९ या तीन वर्षांत मोदी सरकारने तब्बल ७.५ कोटींना गरीबीतून बाहेर काढले आहे. जगाचा हा आकडा ८.३ कोटी आहे. त्यापैकी एकट्या भारताचा वाटा ७.५ कोटींएवढा अभूतपूर्व आहे.
: ब्रूकिंग इन्स्टिट्यूट
(अमेरिकेच्या या ख्यातनाम थिंक टँकचा मार्च २०१९मधील अहवाल)
How much peoples UPA government really lifted out of poverty? Rahul Gandhi claims four different figures
महत्त्वाच्या बातम्या
- BMC Budget : बीएमसी आयुक्तांनी सादर केला ४५,९४०.७८ कोटींचा अर्थसंकल्प, डिजिटल जाहिरातीतून कमाईची योजना
- आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका दीप्ती नवल; आज 70 वा वाढदिवस
- बीएमसीचा ३३७० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर, मुंबईत दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बांधण्याची तरतूद
- आम आदमी पार्टीचे काँग्रेसच्या पुढचे पाऊल; शपथेनंतर उमेदवारांकडून घेतली कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सही!!