विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Historic changes in GST मोदी सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वस्तू आणि सेवा करात (GST) मोठा बदल जाहीर केला आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेले दोन स्लॅब रद्द करून आता कररचना अधिक सोपी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना थेट दिलासा मिळणार आहे.Historic changes in GST
स्वातंत्र्य दिनी लालकिल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी दिवाळीत आनंदाची भेट मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले होते. गुरुवारच्या निर्णयाने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. सरकारने याला “जीएसटी 2.0” ची सुरुवात म्हटले आहे.Historic changes in GST
नव्या रचनेत महसूलाची पुनर्रचना होणार असून करसंकलन अधिक सुटसुटीत होईल, असा दावा वित्त मंत्रालयाने केला आहे. हा बदल सामान्य ग्राहकांसाठी दिलासा देणारा आहे, तर सरकारसाठी कर रचना अधिक कार्यक्षम बनवणारा आहे. दिवाळीपूर्वीचा हा निर्णय बाजारात चैतन्य निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Historic changes in GST
आतापर्यंत जीएसटीमध्ये 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब होते. आता 12% आणि 28% हे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. पुढे केवळ दोनच स्लॅब असतील:
5% स्लॅब: जीवनावश्यक वस्तू 18% स्लॅब: इतर सर्वसामान्य वस्तू याशिवाय, लक्झरी आणि व्यसनासंबंधी वस्तूंसाठी 40% चा नवीन विशेष स्लॅब लागू करण्यात येणार आहे.
कोणत्या वस्तू होणार स्वस्त?
12% वरून 5%: घरगुती वस्तू, विम्याचे हफ्ते, स्टेशनरी, नमकीन, तूप, बटर, कपडे, चप्पल, सायकल, टूथपावडर इत्यादी. 28% वरून 18%: टीव्ही, फ्रिज, एसी, सिमेंट, दुचाकी (350 सीसीपर्यंत), कार (1200 सीसीपर्यंत). कोणत्या वस्तू होणार महाग? नवीन 40% स्लॅबमध्ये खालील वस्तू व सेवांचा समावेश असेल:
पान मसाला, गुटखा, तंबाखू उत्पादने लक्झरी कार व एसयूव्ही ऑनलाइन गेमिंग आणि तत्सम उच्च जोखीमीच्या सेवा सध्याचे जीएसटी संकलन (स्लॅबनुसार) 5% स्लॅब – 7% महसूल 12% स्लॅब – 5% महसूल 18% स्लॅब – 65-67% महसूल 28% स्लॅब – 11% महसूल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App