आता त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे Operation Sindoor
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त भाष्य केल्यानंतर गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे
गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी यांच्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘दिशाभूल करणारी’ आणि ‘निराशाजनक’ कंटेट अपलोड केल्याचा आरोप होता. आता त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणाची माहिती देताना, पोलिस अधीक्षक (सीआयडी-सायबर क्राइम) भरत सिंह टांक म्हणाले की, काँग्रेस नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर, राज्य सीआयडीच्या सायबर क्राइम शाखेने सोनी यांना भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे.
तर भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षविरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले – जे लोक राष्ट्रीय हितासाठी काम करणे पक्षविरोधी कृती मानतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App