• Download App
    मोदींना सतत टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना सरकारचा "हा" निर्णय मात्र आवडला!! Govt to Rahul Gandhi who is constantly targeting Modi

    मोदींना सतत टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना सरकारचा “हा” निर्णय मात्र आवडला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध मुद्द्यांवर थेट टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्या सरकारचा एक निर्णय मात्र आवडला आहे. Govt to Rahul Gandhi who is constantly targeting Modi

    केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांवरच्या कुलींच्या मेहनत मोबदल्यात तब्बल 40 % नी वाढ केल्याने त्या निर्णयावर राहुल गांधींनी समाधान व्यक्त केले. पण त्याचवेळी त्याचे श्रेय देखील स्वतःच घेतले आहे. आता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे 40 किलो सामान उचलण्यासाठी कुलींना 140 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील व्हीलचेअर आणि स्ट्रेचर यांचे दर देखील रेल्वेने वाढविले आहेत.

    काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधींनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकाला भेट देऊन तिथल्या कुलींशी गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांनी कुलींचा डगला घालून एक व्हील असलेली बॅग डोक्यावर घेतली होती. त्यावरून राहुल गांधींना अनेकांनी ट्रोल केले होते.

    पण आता केंद्र सरकारने कुलींच्या समस्यांची दखल घेऊन त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात 40 % वाढ केली आहे. या निर्णयाबद्दल राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर कुलींबरोबरचे आपले जुने फोटो शेअर करून समाधान व्यक्त केले आहे.

    Govt to Rahul Gandhi who is constantly targeting Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार