वृत्तसंस्था
टोकियो : जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांच्याकडे येणार असल्याचे निश्चि त झाले आहे. सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षातील (एलडीपी) नेते पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. मावळते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचे स्थान ते घेणार आहेत. नेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत जपानचे लोकप्रिय लसीकरण मंत्री तारो कोनो यांचा किशिदा यांनी पराभव केला. Fumiyo will become new PM of japan
पहिल्या टप्प्यात तारो यांच्यापेक्षा एक मत जास्त मिळाले होते. कोरोनामुळे खालावलेली अर्थव्यवस्था सावरणे आणि प्रादेशिक सुरक्षेच्याे वाढत्या धोक्याच्या पार्श्वेभूमीवर अमेरिकेशी संबंध बळकट करणे अशी आव्हाने भावी पंतप्रधान किशिदा यांच्यासमोर आहेत.
तसेच पक्षाची प्रतिमा सुधारणेसाठी दबावही आहे. सुगा यांच्या काळात पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीविरोधातील उपाय आणि साथ काळात टोकियो ऑलिंपिकचे आयोजन करण्याची हट्टी भूमिका यावरून सुगा यांच्याबद्दल जनतेत रोष आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App