#PragatiKaHighwayGatiShakti : UPA काळात दिवसाला 12 किमी, तर NDA सरकारमध्ये दिवसाला 37 किमी महामार्ग बांधणी

प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात प्रगतीचा वेग किती आहे, हे मोजण्याच्या अनेक निकषांपैकी एक निकष आहे, रस्ते – महामार्ग बांधणी. या निकषावर तर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे NDA सरकार मागच्या UPA सरकारच्या तुलनेत तिप्पट पुढे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे.From 12 Km per day in the UPA era to 37 Km per day under the NDA regime , see the development graph of India’s world-class highways.

रस्ते बांधणी मोजण्याचे निकष 2014 पूर्वी निश्चित झाले होते, ते तसेच आहेत. त्या पद्धतीला लिनिअर मेजरमेंट म्हणतात.



युपीए सरकारच्या काळात दररोजची सरासरी रस्ते – महामार्ग बांधणी 12 किलोमीटर एवढी होती, तर सध्याच्या मोदी सरकारच्या काळात हेच प्रमाण दुप्पट नव्हे, तर तिप्पट झाल्याचे आकडेवारी सांगते. सध्या एका दिवसाला सरासरी 37 किलोमीटरची रस्ते – महामार्ग बांधणी होत आहे.

रस्ते – महामार्ग बांधणीचा तक्त्यानुसार आढावा घेतला, तर युपीए सरकारच्या काळात 2005 – 2006 मध्ये 2637 किलोमीटर, तर सरकार जाताना म्हणजे 2013 – 2014 या काळात 4260 किलोमीटर रस्ते – महामार्ग बांधणी झाली होती.

तर एनडीए सरकारच्या सुरवातीला म्हणजे 2014 – 2015 या काळात 4410 किलोमीटर, तर 2020 – 2021 या काळात 13327 किलोमीटर रस्ते – महामार्ग बांधणी झाली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्रालय सध्या 10000 किलोमीटरचे ग्रीनफिल्ड महामार्ग बांधत आहे. यापैकी 8000 किलोमीटरचे ग्रीनफिल्ड महामार्ग परवानगीच्या प्रक्रियेत आहेत.

UPA आणि NDA काळातील रस्ते -महामार्ग बांधणीची आकडेवारी अशी :

From 12 Km per day in the UPA era to 37 Km per day under the NDA regime , see the development graph of India’s world-class highways.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात