• Download App
    Pratibha Patil काँग्रेस सह विरोधकांना कॉर्नर करण्यासाठी मोदींचा डाव; मीरा कुमार यांच्या पाठोपाठ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचा सुद्धा महिला आरक्षणाला पाठिंबा!!

    काँग्रेस सह विरोधकांना कॉर्नर करण्यासाठी मोदींचा डाव; मीरा कुमार यांच्या पाठोपाठ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचा सुद्धा महिला आरक्षणाला पाठिंबा!!

    नाशिक : संसदेच्या विशेष अधिवेशना नारीशक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण मंजूर करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा नवा डाव टाकला. त्यांनी आधीच लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांचा पाठिंबा मिळविला. त्या पाठोपाठ आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही पाठिंबा मिळविला. या दोन पाठिंब्यांमधून नरेंद्र मोदींनी काँग्रेस सह सर्व विरोधकांना राजकीय दृष्ट्या कॉर्नर केले. Pratibha Patil

    महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले ते उद्यापासून म्हणजेच 16 एप्रिल ते 18 एप्रिल असे तीन दिवस होणार असून त्यामध्ये सविस्तर चर्चेनंतर महिला आरक्षण आणि लोकसभा आणि विधानसभांच्या मतदारसंघांची फेररचना आणि संख्यावाढ होणार आहे.

    काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेला आणि संख्यावाढीला विरोध आहे. कारण मोदी सरकार भाजपला अनुकूल अशी फेररचना करण्याची त्यांना भीती वाटत आहे.

    •  मोदी – खर्गे यांची परस्पर विरोधी पत्रे

    या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय पत्र युद्ध रंगले होते. दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या विरोधातले मुद्दे मांडणारी पत्रे पाठविली.

    • मीरा कुमारांचा सरकारला पाठिंबा

    पण त्याच वेळी नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या मीरा कुमार यांना निमंत्रित करून त्यांचा पाठिंबा मिळवला. त्या कार्यक्रमात मीरा कुमार उपस्थित राहिल्या आणि त्यांच्या उपस्थितीची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मीरा कुमार या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. त्याचबरोबर त्या काँग्रेसचे वरिष्ठ दलित नेते जगजीवन राम यांच्या कन्या असल्यामुळे त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मीरा कुमार यांच्या रूपाने काँग्रेसच्या वरिष्ठ महिला नेत्या मोदींच्या बाजूने उभ्या राहिल्याचे चित्र निर्माण झाले.



    • प्रतिभाताई पाटलांचे मोदींना पत्र

    पण मोदी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रतिभाताई पाटील यांचा सुद्धा पाठिंबा मिळवून दाखविला. प्रतिभाताई पाटलांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देणारे पत्र पाठविले. मोदी सरकार लागू करत असलेल्या महिला आरक्षणामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळेल, असा आशावाद प्रतिभाताई पाटलांनी व्यक्त केला.

    • विरोधकांच्या मनात संशयाची पेरणी

    मीरा कुमार आणि प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या दोन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसची गोची झाली. काँग्रेसच्या दोन महिला नेत्या मोदी सरकारच्या बाजूने उभे राहिल्याने काँग्रेसच्या संसदेमधल्या भूमिकेबद्दल दाट संशय निर्माण झाला. त्याचबरोबर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या बाकीच्या विरोधकांच्या मनातही संशयाची पाल चुकचुकली.

    Former President Pratibha Patil supports women reservation bill

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tejas Jet : आता भारतातच तयार होणार तेजस फायटर जेट इंजिन; यूएस कंपनी जीई एअरोस्पेस आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा करार पूर्ण

    संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची मोदींची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!

    Chhattisgarh : छत्तीसगड- वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर फुटला, 12 जणांचा मृत्यू; 30-40 मजूर भाजले