• Download App
    पाकव्याप्त भूभाग प्रथम आमच्या ताब्यात द्या; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला खडसावले । first give back the occupied land of kashmir ; India beats Pakistan in UN

    पाकव्याप्त भूभाग प्रथम आमच्या ताब्यात द्या; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला खडसावले

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : फाजील बडबडी करण्याऐवजी प्रथम भारताचा बळकावले काश्मीरचा भूभाग प्रथम परत करा, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. first give back the occupied land of kashmir ; India beats Pakistan in UN

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत भारताच्या प्रतिनिधी डॉ. कौशल भट यांनी याबाबत पाकिस्तानला असे सांगून झटका दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला. संयुक्त राष्ट्रसंघात प्रथमच भारताने ही प्रथम मागणी केली.



    १९४७ नंतर पाकिस्तानने काश्मीरचा एक तुकडा तोडला असून त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखले जाते. परंतु या भूभागावर भारताचा अधिकार आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून पाकिस्तान हत्या घडवत आला आहे. अनेक भारतीय अधिकारी आणि जवानांनी रक्ताचे पाट वाहीले आहेत.

    भारताचा भूभाग बाळकावून उलट काश्मीरी राग आळविळणाऱ्या पाकिस्तानला प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक धक्का बसला आहे. काश्मीर बळकावण्यासाठी वारंवार होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा निषेधही डॉ. कौशल भट यांनी केला. दहशतवादी हल्ले चढवून पाकिस्तानने छुपे युद्ध पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    first give back the occupied land of kashmir ; India beats Pakistan in UN

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते