Donald Trump : ‘मी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता केली, आता मी इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवेन’, ट्रम्प यांचे वक्तव्य
इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली सैन्याने सांगितले की या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही आणि क्षेपणास्त्रे हवेत पाडण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला शांततेसाठी करार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की हे दोन्ही कट्टर शत्रू “तडजोड करतील.”