Kerala : केरळमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान स्फोट, 150 हून अधिक लोक जखमी

Kerala

वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : Kerala दिवाळीपूर्वी केरळच्या कासारगोडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या साठ्यात मोठा स्फोट झाला. या घटनेत 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटामुळे घटनास्थळी परिस्थिती बिघडली. कार्यक्रमाला शेकडो लोक जमले होते.Kerala



अंजुतांबलम वीरकावू मंदिरात ही घटना घडली. येथे मंदिरात वार्षिक कालियाट्टम उत्सव साजरा केला जात होता. कार्यक्रमासाठी फटाक्यांची ऑर्डर देण्यात आली होती. ते एका स्टोअरेजमध्ये सुरक्षित ठेवले होते. दरम्यान, रात्री 12.30 वाजता अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच धुराचे लोट उठू लागले.

घटनेदरम्यान लोकांनी मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. या स्फोटामुळे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील 97 जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

Explosion during firecrackers in Kerala, over 150 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात