वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.Expel Narayan Rane from the post of Minister; MP Vinayak Raut’s letter to Prime Minister Narendra Modi
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. ती दुर्दैवी आहे. ”हा कसला मुख्यमंत्री आहे. ज्याला आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन माहीत नाही. मी तेथे असतो तर कानाच्या खाली थप्पड वाजविली असती.” अशी हिंदीतील ओळ त्यांनी पत्रात लिहिली आहे. अशी भाषा सहन केली जाऊ नये. शिष्टाचार राखला गेला पाहिजे, असं विनायक राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला.
मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. त्यावरुन नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
Expel Narayan Rane from the post of Minister; MP Vinayak Raut’s letter to Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता, तर मग शरद पवार कोण??; नारायण राणेंना अटक करणाऱ्या शिवसेनेमागे राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय फरफट
- नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठविले; ऑर्डर नसताना पोलीसांनी केली अटक; चिरंजीव निलेश राणे पोलीसांवर प्रचंड भडकले
- ओवेसी अफगाणिस्तानबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगलाही उपस्थित राहतील, 26 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक होईल
- BIG BREAKING : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांकडून अटक