विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकमधील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली या घटनेची निंदा करत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
disrespected acts against chhatrapati shivaji maharaj’s name will never be tolerated ; Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणतात की, गेली कित्येक वर्षे कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. शिवाजी महाराज हे आख्ख्या भारताचे दैवत आहेत. राज्यात सरकार कुणाचेही असो पण दैवते कधीही बदलली जात नाहीत. कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता लवकरात लवकर राज्य सरकारला आदेश द्यावेत आणि या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे.
पुढे ते म्हणतात की, भाजप शासित कर्नाटकात शिवाजी महाराजांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. पुढे ते म्हणतात, अख्खी मराठी अस्मितेला डिवचणे हे परवडणारे नाही, हे ध्यानात घ्यावे. केंद्र सरकारने दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावीत. भ्याड प्रकार थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही.
छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवतांचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
disrespected acts against chhatrapati shivaji maharaj’s name will never be tolerated ; Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ