वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Delhi Police दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी चार तस्करांना अटक करत १० परदेशी बनावटीची पिस्तुले आणि ९२ काडतुसे जप्त केली. यात ३ तुर्की बनावटीचे पीएक्स-५.७ पिस्तूल, पाच चिनी बनावटीचे पीएक्स-३ पिस्तुलांचा समावेश आहे. ही पिस्तुले विशेष दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाचे मॉडेल आहेत.Delhi Police
हे नेटवर्क उत्तर भारतातील अनेक कुख्यात टोळ्यांना प्रगत शस्त्रे पुरवतात. हे मॉड्यूल ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून भारतात शस्त्रे पोहोचवत असे. कस्टमाइज्ड ड्रोन रात्री पंजाब सीमेवरील संवेदनशील भागात कमी उंचीवर उडत जीपीएस स्थानांवर पॅकेजेस टाकत. स्कॅनिंगपासून बचावासाठी पॅकेजेस कार्बन-लेपित मटेरियलमध्ये गुंडाळलेले होते. स्थानिक रिसीव्हर्स पॅकेजेस उचलत. तेथून ते दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश व पंजाबमधील टोळ्यांना पुरवले जात होते. हे मॉड्यूल एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप्सद्वारे संपर्क साधत होते.Delhi Police
कोचीन शिपयार्डची गोपनीय माहिती आयएसआयला पुरवणाऱ्या उत्तर प्रदेशामधील दोन आरोपींना अटक
उडुपी | कर्नाटकातील उडुपी पोलिसांनी कोचीन शिपयार्डशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला दिल्याच्या आरोपाखाली रोहित (२९) आणि संत्री (३७) यांना अटक केली आहे. ते उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी आहेत. सुषमा मरीन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये इन्सुलेटर म्हणून काम करणारा व पूर्वी केरळमधील कोचीन शिपयार्डमध्ये काम करणारा रोहित, व्हॉट्सॲपद्वारे भारतीय नौदलाच्या जहाजांचे नंबर आणि इतर गोपनीय माहिती शेअर करत असल्याचा आरोप आहे. मालपे येथे तैनातीनंतरही तो कोची येथील एका मित्राकडून माहिती मिळवत राहिला आणि ती एका व्यक्तीला पाठवत राहिला. शिपयार्डच्या सीईओच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत दोघांना ३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
सध्या अमेरिकेत असलेला सोनू खत्री टोळीचा सूत्रधार
पोलिसांनुसार, या प्रकरणातील सूत्रधार पंजाबमध्ये जन्मलेला गुंड सोनू खत्री ऊर्फ राजेश कुमार असून तो सध्या अमेरिकेत आहे. तो ४५ हून अधिक गुन्ह्यांमध्ये हवा आहे. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. १९ नोव्हेंबरला पोलिसांना सोनूच्या नेटवर्कशी संबंधित शस्त्रसाठा दिल्लीत येत असल्याची माहिती मिळाली. या आधारे, मनदीप सिंग (३८) ऊर्फ पिता ऊर्फ मनिप्रीत व दलविंदर कुमार (३४) यांना अटक केली. कारमधून ८ परदेशी बनावटीचे पिस्तुले आणि ८४ काडतुसे जप्त करण्यात आली. पांढऱ्या रंगाची कारही जप्त करण्यात आली. त्यांच्या माहितीनुसार, बागपतचा रहिवासी रोहन तोमर (३०) आणि अजय (३७) ऊर्फ मोनू यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आणखी दोन पिस्तुले व आठ काडतुसे जप्त केली. मनदीपवर खून, हत्येचा प्रयत्न, गँगस्टर कायदा व एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. दलविंदर पूर्वी दुबईमध्ये काम करत होता आणि आर्थिक अडचणींना तोंड देत गुन्हेगारीत सामील झाला. दोन्ही गुंड सोनू खत्रीचा जवळचा सहकारी जसप्रीत ऊर्फ जसशी संबंधित आहेत. जस सध्या परदेशात असून त्याचा आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे.
Delhi Police Busts ISI Arms Smuggling Gang Arrest 4 Pistols Drones Pakistan Photos Videos
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये एनडीएच्या विजयात आरएसएसची भूमिका ठरली महत्वाची : मिशन त्रिशूळची कमाल
- भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांचा पूर; पण एकनाथ शिंदेंचा वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद
- Trump’s : युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा 28 कलमी प्रस्ताव; झेलेन्स्कींना जमीन सोडावी लागेल, सैन्य हटवावे लागेल
- अहंकार मोडण्यासाठी शिवसेना मैदानात; डहाणूच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार