Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दहशतवादी मॉड्यूलविरोधात मोठी कारवाई करत आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी मंगळवारी या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण मॉड्यूलमधील अटक आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.