• Download App
    Terror Plot Foiled: Delhi Police Arrest 4 with Remote-Controlled Toy Car IEDs टॉय कारमध्ये आयईडी ठेवून अतिरेकी हल्ल्याचा कट; तीन राज्यांतून 4 तरुण अटकेत

    Delhi Police : टॉय कारमध्ये आयईडी ठेवून अतिरेकी हल्ल्याचा कट; तीन राज्यांतून 4 तरुण अटकेत

    Delhi Police

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Delhi Police दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधील चार तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण दहशतवादी कारवायांचा कट रचत होते आणि त्यांनी अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी पूर्ण केली होती. या कारवाईत पोलिसांनी एक आयईडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दोन आरोपी रिमोट कंट्रोल असलेल्या खेळण्यातील कारमध्ये आयईडी बसवून ‘स्टेल्थ अटॅक’ (गुप्त हल्ला) करण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.Delhi Police

    गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता, असे सुरक्षा यंत्रणांचे मानणे आहे. आरोपी बंद आणि ‘एनक्रिप्टेड’ सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सक्रिय होते, जिथे जिहाद, कट्टरपंथी विचारसरणी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित माहिती शेअर केली जात असे.एका आरोपीने लाल किल्ल्याच्या ‘एडिटेड’ फोटोवर काळा झेंडा लावून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, शेख इमरान व मोहम्मद सोहेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.Delhi Police



    लाल किल्ला, इंडिया गेटची डिसेंबरमध्ये रेकी

    एका आरोपीने डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीत येऊन लाल किल्ला व इंडिया गेटची रेकी केली होती,असे तपासात समोर आले. या मॉड्यूलने अयोध्येचे राम मंदिर, संसद भवन, काही लष्करी ठिकाणांवर हल्ल्याच्या शक्यतांवरही चर्चा केली होती.

    सीमापार ८०० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

    श्रीनगर| जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाची कमकुवत होत चाललेली मुळे पाहून बिथरलेला पाकिस्तान पुन्हा घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. नियंत्रण रेषेच्या पलीकडे ७० लाँचिंग पॅडवर ८०० दहशतवादी सक्रिय आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर खोऱ्यात आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर दक्षता वाढवण्यात आली आहे.

    Terror Plot Foiled: Delhi Police Arrest 4 with Remote-Controlled Toy Car IEDs

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Women’s Reservation : द फोकस एक्सप्लेनर : महिलांच्या सक्षमीकरणाची ऐतिहासिक संधी हुकली? मोदी सरकारच्या पुढाकाराला विरोधकांचा खोडा

    PM Modi : काँग्रेसने देशासमोर विधेयकाची भ्रूणहत्या केली- पंतप्रधान मोदी म्हणाले, आरक्षणातील अडथळा मी दूर करेन…

    Hormuz : होर्मुझ पुन्हा बंद; इराणने भारताचे 14 टँकर रोखले, 2 वर गोळीबार, भारताने इराणी राजदूत फथालींना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला