Delhi Police : टॉय कारमध्ये आयईडी ठेवून अतिरेकी हल्ल्याचा कट; तीन राज्यांतून 4 तरुण अटकेत
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधील चार तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण दहशतवादी कारवायांचा कट रचत होते आणि त्यांनी अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी पूर्ण केली होती. या कारवाईत पोलिसांनी एक आयईडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दोन आरोपी रिमोट कंट्रोल असलेल्या खेळण्यातील कारमध्ये आयईडी बसवून ‘स्टेल्थ अटॅक’ (गुप्त हल्ला) करण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.