संजय सिंह यांच्या विरोधात लाचखोरीचे पुरावे असल्याचे ईडीने न्यायालयात म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात अटक झालेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे . राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ED custody of Sanjay Singh till October 13 MPs express fear of encounter
ईडीने संजय सिंह यांना पाच दिवसांची रिमांड मागितली होती, मात्र कोर्टाने तीन दिवसांची रिमांड दिली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, संजय सिंह यांच्या विरोधात लाचखोरीचे पुरावे आहेत. मद्य धोरण घोटाळ्यात संजय सिंह यांनी लाच मागितली होती, मात्र ती रक्कम देण्यात आली नाही. तपासात सहकार्य न केल्याचा आरोपही ईडीने संजय सिंह यांच्यावर केला आहे.
दुसरीकडे आपचे खासदार संजय सिंह यांनी एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की, जेव्हा ईडीने मला रिमांडवर घेतले तेव्हा रात्री १०.३० वाजता त्यांनी मला सांगितले की तुम्हाला बाहेर जावे लागेल. ते मला कुठे नेत आहेत असे मी विचारले असता त्यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. यावर मी त्यांना थांबवले आणि म्हणालो की तुम्ही न्यायाधीशांना सांगितले का ? तर ते म्हणाले की वरून फोन आला आहे. शेवटी कोणाच्या सांगण्यावरून मला वर पाठवायची तयारी झाली ते सांगा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App