विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जतनेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.Delhi :Arvind Kejriwal announces weekend curfew; malls, gyms to shut on weekdays
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड कर्फ्यू लावत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. तसेच आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभांना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल आणि चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे.
त्याचबरोबर पदार्थांची होम डिलिव्हरी व आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना कोरोना निर्बंधांचे पालन करावे लागेल. तर कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App