वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी फक्त 28 जागा लढवणाऱ्या काँग्रेसने आज पक्षाचे भले मोठे घोषणापत्र जाहीर केले. त्यामध्ये तब्बल तीन लाख नोकऱ्या आणि दहा हजार महिला कमांडोंचे महिलांना संरक्षण अशा प्रकारची आश्वासने दिली.Congress unveils Tamil Nadu poll manifesto, promises Universal Basic Income, 3 lakh jobs and 10,000 women commandos
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांच्या उपस्थितीत काँग्रेसने घोषणापत्र जाहीर केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यावेळी उपस्थित नव्हते ते केरळ मधले काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला मात्र उपस्थित राहिले होते.
तामिळनाडू मध्ये काँग्रेस सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाबरोबर आघाडीत आहे. पण द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने काँग्रेसला फक्त 28 जागा लढवायला दिल्यात. तरीसुद्धा काँग्रेसने घोषणापत्र जाहीर करण्यात आणि त्यामध्ये भरमसाठ आश्वासने देण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही.
– काँग्रेसने तामिळ जनतेला दिलेली आश्वासने अशी :
– प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 2000 रुपये देणार
– 300 दिवसांमध्ये 300000 नोकऱ्या देणार
– 40000 पोलिसांची भरती, त्यामध्ये 10000 महिला कमांडोंचा समावेश करणार
– तामिळनाडूला ग्लोबल स्प्रिच्युअल टुरिझम सेंटर बनवणार. प्रत्येक पर्यटन स्थळावर बहुभाषिक गाईड उपलब्ध करून देणार
– पोलीस अग्निशमन रुग्णवाहिका, चाइल्ड हेल्पलाईन साठी इंटिग्रेटेड कॉल सेंटर उभारणार
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App