Sindoor ka Saudagar “मौत का सौदागर” नंतर “सिंदूर का सौदागरची” पुढची चूक; अनेक वर्षे मार खाऊनही काँग्रेसची भागेना भूक!!

Sindoor ka Saudagar

नाशिक : “मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे. Sindoor ka Saudagar

काँग्रेसने 2007 मध्ये त्या वेळच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना मौत का सौदागर म्हणून हिणवले होते. त्यानंतर आज तागायत काँग्रेस गुजरात मध्ये सत्तेवर येऊ शकली नाही. ज्यांना “मौत का सौदागर” म्हणून हिणवले, ते नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदाची कारकीर्द यशस्वी करून पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कारकिर्दी पर्यंत येऊन पोहोचले. गेल्या 18 वर्षांमध्ये भाजपने मोदींच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसला ठिकठिकाणी तडाखे दिले. अनेक ठिकाणी मार दिला. गांधी घराण्याची सत्ता कायमची उन्मळून पडेल, अशी “व्यवस्था” निर्माण केली.

पण एवढे सगळे होऊन देखील काँग्रेसने सुधारायचे नाव घेतले नाही. “मौत का सौदागर” ही चूक काँग्रेसला महागात पडली, तरी काँग्रेसने आज पुढची चूक करायची ती केलीच.

Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या एका वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेसने त्यांना “सिंदूर का सौदागर” या शब्दांनी हिणवले.

Operation sindoor मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना आम्ही पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला होता की तुमचे लष्कर बाजूला ठेवा. आम्हाला दहशतवाद्यांना ठेचायचे आहे. पण पाकिस्तान्यांनी आमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि मार खाल्ला, असे वक्तव्य जयशंकर यांनी केले होते.

मात्र, जयशंकर यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी जयशंकर यांनी पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाची माहिती leak केली. त्यामुळे भारतीय सैन्य दलाचे अफाट नुकसान झाले, असा आरोप केला. त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी भारतीय सैन्य दलाने किती विमाने गमावली??, असा खोचक सवाल मोदी सरकारला केला.

पण राहुल गांधींच्या या टीकेला सरकारने आणि भारतीय सैन्य दलाने उत्तर दिले. कुठल्याही मोहिमेत गुप्तता ही‌ यशाची गुरुकिल्ली असते. भारतीय 9 ठिकाणी हल्ले करून 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले. त्यामुळे कुठला गुप्तता भंग व्हायचा प्रश्नच उद्भवला नाही, असे वक्तव्य भारतीय सैन्य दलाने केले.



मात्र काँग्रेसला भारतीय सैन्याचे हे वक्तव्य पटले नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी जयशंकर यांच्यावर “सिंदूर का सौदागर” अशी टीका करून नवा हल्लाबोल केला. काँग्रेसने पत्रकार परिषदेत जयशंकर यांचा “bite” तोडून मरोडून चालविला. जयशंकर यांना गुप्तताभंग करायचा अधिकार दिला कुणी??, असा सवाल केला.

गुजरात मधल्या दंगलीच्या वेळी काँग्रेसच्या त्या वेळच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना असेच “मौत का सौदागर” म्हणून हिणवले होते, पण त्याचा परिणाम उलटाच झाला. गुजरातच्या जनतेने नरेंद्र मोदींना भरभरून पाठिंबा दिला. काँग्रेसचा सुपडा साफ केला. त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला. काँग्रेसचा अस्त झाला.

पण या दारूण अनुभवातून काँग्रेसचे नेते काहीही शिकले नाहीत, म्हणूनच “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी झाल्यानंतर देखील काँग्रेसच्या नेत्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना “सिंदूर का सौदागर” म्हणून हिणवले. याचा परिणाम काय होईल??, याचा फार मोठा अभ्यास करण्याची गरज आहे??

Congress repeating mistakes calling maout ka Saudagar and sindoor ka Saudagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात