• Download App
    Congress leader Rahul Gandhi's Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration

    बलात्कार पिडीतेची ओळख उघड करणारे राहुल गांधींचे ट्विट ट्विटरने हटविले; काँग्रेसने केली restoration साठी मखलाशी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली येथील अल्पवयीन बलात्कार पिडीतेची ओळख सार्वजनिक करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विट अखेर ट्विटरने हटविले आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने तशी नोटीस ट्विटरला बजाविली होती. Congress leader Rahul Gandhi’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration

    काँग्रेसने याबाबत मखलाशी केली असून योग्य ती कारवाई करून राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट पुनर्स्थापित केले जाईल, असे ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून करण्यात आले आहे.

    राहुल गांधी यांनी बेजबाबदारपणे बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांचे छायाचित्र ट्विट केले होते. मात्र, पॉक्सो कायद्यानुसार अशाप्रकारे बलात्कार पिडीतेच ओळख उघड करणे हे कायद्याटे उल्लंघन आहे. त्यामुळे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने त्याची गंभीर दखल घेऊन राहुल गांधी यांचे ट्विट हटविण्यात यावे, असे निर्देश ट्विटरला दिली होती. त्यानुसार, ट्विटरने शुक्रवारी रात्री राहुल गांधी यांचे ते ट्विट हटविले.

    दिल्ली येथे नऊ वर्षीय बालिकेचा बलात्कार आणि हत्येची गंभीर घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, यावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्ष राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

    पण, राहुल गांधी यांनी अद्याप खेलरत्न पुरस्कार नामकरण अथवा ऑलिम्पिक गोल्ड मेडल याबद्दल काहीही बोलले नाहीत.
    त्यावरून टीका टाळण्यासाठी काँग्रेसने ही मखलाशी केली असल्याची शक्यता आहे.

    Congress leader Rahul Gandhi’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’