काँग्रेस हायकमांडच्या राम विरोधी निर्णयाचा उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांना फटका; अयोध्येत धक्काबुक्की करून जनतेने दिला झटका!!

Congress High Command's anti-Ram decision hits Uttar Pradesh Congress leaders

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्यातील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांना दिले होते. परंतु हे निमंत्रण काँग्रेस नेत्यांनी फेटाळले. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. Congress High Command’s anti-Ram decision hits Uttar Pradesh Congress leaders

मात्र, या रामविरोधी निर्णयाचा फटका काँग्रेसच्या हायकमांडला न बसता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश मधल्या नेत्यांना अयोध्येत बसला. अयोध्येत राम दर्शनाला पोहोचलेल्या प्रदेश स्तरावरच्या नेत्यांना तिथल्या जनतेने धक्काबुक्की करून अयोध्येत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांसोबत त्यांची झडप झाली.

काँग्रेस कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातून झेंडा खेचून घेतला. अयोध्येत राम मंदिर दर्शनाच्या वेळी ही वादावादी झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचा झेंडा फडकावण्यावरुन हा सगळा वाद झाला. आरोप आहे की, राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच काँग्रेसचे कार्यकर्ते झेंडा फडकावण्याचा प्रयत्न करत होते. तिथे उपस्थित काही लोकांनी याचा विरोध केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढचा प्रसंग टाळला

याआधी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख अजय राय हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह नेते अयोध्येत रामलल्लांच्या दारात पोहोचले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी अयोध्येत स्नानही केलं होतं.  पण जनतेने त्यांना ओळखताच त्यांना मंदिरात जायला प्रतिबंध केला त्यांच्या हातातले काँग्रेसचे झेंडे हिसकावून घेतले. त्यांना धक्काबुक्की केली. अयोध्येतल्या राम मंदिरा विरोधात काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी निर्णय घेतला, पण त्याचा फटका उत्तर प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांना असा बसला.

Congress High Command’s anti-Ram decision hits Uttar Pradesh Congress leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात