• Download App
    ‘चीन वैज्ञानिक प्रगती अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा|China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; retired Naval chief warns

    ‘चीन वैज्ञानिक प्रगती अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘चीन वैज्ञानिक प्रगती करतोय अन् आपण मंदिर, मशिदींवर वेळ घालवतोय’; वेळीच सावध व्हा, असा इशारा माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी दिला आहे.China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; retired Naval chief warns

    प्रेम स्मृती व्याख्यानमालेत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.अरुण प्रकाश म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकवून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच ऊर्जा खर्च झाली आहे.”



    माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश पुढे म्हणाले की, “देशाला मागे नेणारे प्रश्न कायमस्वरूपी संपवण्याची गरज आहे. चीनमध्ये आर्टिफिशिल इंटेलिजन्स ( कृत्रिम बुद्धिमत्ता ), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरु आहे. त्या दृष्टीने संशोधनदेखील सुरू आहे.

    अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील.”“देशात सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशात शांतता हवी आहे. आपण चीनचे आव्हान समोर ठेऊन तयारी करायला हवी.

    चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कारण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपल्बध आहेत.आता चीनचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज व्हायला हवं.”दरम्यान, २००४ ते २००६ या दोन वर्षांत अरुण प्रकाश हे देशाचे नौदलप्रमुख होते. त्यांचे हे विचार आजच्या वाढत्या हिंसाचाराच्या घडीला अतिशय मोलाचे आहेत.

    China is making scientific progress and we are spending time on temples and mosques’; retired Naval chief warns

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Monsoon : केरळमध्ये मान्सूनची दमदार एंट्री; 78 सेमीपर्यंत पावसाचा अंदाज, जून-जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेचा इशारा

    NEET Paper Leak : NTAला सर्वोच्च न्यायालयाचे फटकारे; ‘मागच्या चुका असूनही धडा घेतला नाही’, NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र-सीबीआयला नोटीस

    Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक