मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. बैठकीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

Goa Election: After Shiv Sena's offer now AAP Offers to late Manohar Parrikars son; Kejriwal invites Utpal Parrikar to join party in Goa

अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये अनेक बाबींवर मतभेद असल्याचे दिसून आले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये अनेक बाबींवर मतभेद आहेत. त्यामुळे ते या बैठकीस उपस्थित राहणार की नाही, याबाबत शंका होती. आता या बैठकीत केजरीवाल सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Chief Minister Arvind Kejriwal will attend the Mumbais I.N.D.I.A. meeting

नुकतेच, आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी छत्तीसगडमधील सरकारी शाळांचा दर्जा निकृष्ट असल्याचा दावा करत आपला इंडिया  आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर लगेचच काँग्रेस नेते पवन खेडा यांनी छत्तीसगडची दिल्लीशी तुलना केल्याबद्दल केजरीवाल यांना प्रश्न केला. ते म्हणाले की, छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारची आधीच्या रमणसिंग सरकारशी तुलना करण्याची गरज आहे ? केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील सरकारी शाळांची स्थिती पहा किंवा दिल्लीत राहणाऱ्या तुमच्या नातेवाईकांना विचारा. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शिक्षण क्षेत्रासाठी एवढं काम करणारे सरकार आले आहे. आम्ही राजकारणी नाही, आम्ही तुमच्यासारखी सामान्य जनता आहोत.

केजरीवाल यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, केजरीवालांनी रायपूरला येण्याची गरज नाही. रायपूरला का भेट दिली? आमच्या छत्तीसगड सरकारच्या कामगिरीची तुलना मागील रमणसिंग सरकारशी केली जाईल. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून या आणि दिल्लीतील काँग्रेस सरकार विरुद्ध आपल्या सरकारच्या कामगिरीची तुलना करूया. चर्चेसाठी तयार आहात का?” असं ते म्हणाले होते.

Chief Minister Arvind Kejriwal will attend the Mumbais I.N.D.I.A. meeting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात