• Download App
    NAGPUR : नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी ; काँग्रेसला धक्का । candidate Chandrashekhar Bawankule wins in Nagpur Assembly elections, Congress loses

    NAGPUR : नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी ; काँग्रेसला धक्का

    • महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे. एकतर्फी विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले झाले आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती. (BJP candidate Chandrashekhar Bawankule wins in Nagpur Assembly elections, Congress loses

    छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1  मिळालं आहे.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.



    नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली होती. माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली.

    559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत. तसेच भाजपमधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.

    candidate Chandrashekhar Bawankule wins in Nagpur Assembly elections, Congress loses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य