• Download App
    चिपी विमानतळावर ९६ परदेशी प्रवासी दाखल; एक प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह 96 passengers from abroad arrive at Chippewa Airport; one migrant positive

    चिपी विमानतळावर ९६ परदेशी प्रवासी दाखल; एक प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत उतरलेल्या ९६ परदेशी प्रवाशांपैकी तपासणीत एक प्रवासी कोरोना बाधित आढळल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली. 96 passengers from abroad arrive at Chippewa Airport; one migrant positive


    पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनाचा धोका वाढला


    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर परदेशी पर्यटक उतरू लागले असून ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत चिपी विमानतळावर एकूण ९६ परदेशी प्रवासी उतरले. त्यापैकी ७ दिवस पूर्ण झालेल्या २५ प्रवाशांची आरटीपीसी आर तपासणी करण्यात येत आहे.

    ८ डिसेंबर पासून जिल्ह्यातील चिपी विमानतळावर उतरलेल्या ९६ प्रवाशांमध्ये वैभववाडी २, कणकवली ८, देवगड १५, मालवण ५, कुडाळ १०, वेंगुर्ला १५ सावंतवाडी ३६,तर दोडामार्ग ५,असे एकूण ९६ प्रवासी दाखल झाले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

    96 passengers from abroad arrive at Chippewa Airport; one migrant positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली