Chandrashekhar Bawankule : राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार; धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे
राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे.