विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरुवातीलाच शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षावर निवडणूक लढवायची बंदी घातली त्यानंतर झालेल्या मतदानात तिथली नॅशनलिस्ट पार्टी सत्तेवर आली पण ती पार्टी सत्तेवर येताच त्या पार्टीच्या नेत्यांनी भारताशी पंगा घेतला. शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केलीBangladesh’s nationalist party has clashed with India as soon as it came to power; Sheikh Hasina’s extradition demanded
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तिथल्या मोहम्मद युनूस सरकारने शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर निवडणूक लढवायला बंदी घातली होती. त्यामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामी यांच्यातच मुख्य लढत झाली. बाकी छोटे मोठे पक्ष निवडणुकीत होते पण दोनच पक्षांमध्ये लढत झाल्यामुळे बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी मोठ्या फरकाने जिंकली. त्या पार्टीचे नेते तारीक रहमान पंतप्रधान होण्याचे निश्चित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशात लोकशाही सरकार स्थापन झाल्या विषयी समाधान व्यक्त केले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
– खायचे दात दाखविलेच
पण त्या पलीकडे जाऊन बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने आपले खरे दात दाखवायचे सोडले नाही. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जेव्हा तिथे सत्तेवर आली, त्या प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्या पक्षाच्या सरकारने भारताशी पंगा घेतला. त्याचेच रिपीटेशन नवे सरकार स्थापन होण्यापूर्वी झाले. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या प्रवक्त्याने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण मागितले. शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. भारताने त्यांचा राजकीय आश्रय काढून घ्यावा त्यांना बांगलादेशात परत पाठवावे त्या बांगलादेशात येऊन भ्रष्टाचाराच्या खटल्यांना सामोरे जातील असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा प्रवक्ता सलाउद्दीन अहमद याने सांगितले. त्यामुळे बांगलादेश नॅशनल पार्टीचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App