बेरोजगार मुस्लिम तरुणांना पैसे आणि मुलींचे आमिष, ISIS दहशतवादी झोएबने 50 मुलांची केली भरती

देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले ; खुलासा झाल्याने खळबळ


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ISIS बाबत मोठा खुलासा झाला आहे. या वर्षी, 15 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेला ISIS दहशतवादी मोहम्मद जोएब खान याने NIA चौकशीदरम्यान धक्कदायक माहिती दिली आहे. तपास यंत्रणेने सांगितले की, जोएब खानने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील 50 मुलांना प्रशिक्षण दिले आहे. या सर्व मुलांना बॉम्ब बनवण्याचे, ते पेरण्याचे आणि देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.Baiting unemployed Muslim youth with money and girls, ISIS terrorist Zoeeb recruited 50 boys

या सर्वांना जोडण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. यातूनच हे सर्व एकमेकांशी जोडले जायचे, बोलायचे. झोएब खानने एनआयएला सांगितले की, बेरोजगार तरुणांना टार्गेट करून पैसे आणि मुलींचे आमिष दाखवले जात होते. यानंतर ते सर्व सामील व्हायचे.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी मोहम्मद जोएब खान याच्या चौकशीदरम्यान एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. एनआयएच्या तपासात समोर आले आहे की मोहम्मद जोएब खान सोशल मीडियाच्या माध्यमातून ISIS मध्ये सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांशी संपर्क साधायचा. बेरोजगार मुस्लिम तरुण हे त्यांचे लक्ष्य होते. तो बेरोजगार मुस्लिम तरुणांना पैसे आणि मुली देऊ करत असे. एवढेच नाही तर त्याने ५० तरुणांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता ज्यांना त्याने भरती केले होते. या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले जायचे.

संशयित ISIS दहशतवादी झोएब खानने तपास यंत्रणेला सांगितले की, तो सर्व ५० मुलांशी फक्त व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्क साधत असे. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून तो त्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत असे. तो या सर्व मुलांना प्रशिक्षण देत असे आणि देशातील विविध संवेदनशील ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या नियोजनाची माहिती देत ​​असे. एनआयए आता झोएब खानने भरती केलेल्या ५० मुलांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. इसिसचा दहशतवादी मोहम्मद शोएब खानच्या सूचनेनुसार जोएब खान या सर्व गोष्टी करत होता. शोएब खानला NIA ने लिबियातून अटक केली आहे.

Baiting unemployed Muslim youth with money and girls, ISIS terrorist Zoeeb recruited 50 boys

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात