• Download App
    पाकिस्तानमध्ये शिखांवर हल्ले वाढले, भारताने PAK उच्चायोगाच्या राजदूताला बोलावले, चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी|Attacks on Sikhs increase in Pakistan, India summons PAK High Commission Ambassador, demands inquiry and report

    पाकिस्तानमध्ये शिखांवर हल्ले वाढले, भारताने PAK उच्चायोगाच्या राजदूताला बोलावले, चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये शीख समुदायाच्या लोकांवर हल्ले वाढले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत चार घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत भारत सरकारने सोमवारी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ राजनयिकाला बोलावले.Attacks on Sikhs increase in Pakistan, India summons PAK High Commission Ambassador, demands inquiry and report

    वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार – पाकिस्तानच्या राजनयिकाला शिखांवर झालेल्या हल्ल्यांची गांभीर्याने चौकशी करण्यास सांगितले असून हा तपास अहवाल भारतासोबत शेअर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

    याशिवाय पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ठोस व्यवस्था करण्यासही पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. भारताचे म्हणणे आहे की, धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे नुकत्याच झालेल्या हल्ल्यांवरून स्पष्ट झाले आहे.



    शनिवारी झाला हल्ला

    पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘द न्यूज इंटरनॅशनल’च्या रिपोर्टनुसार – शनिवारी दुकानातून घरी परतणाऱ्या एका शीख व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यात मनमोहन सिंग नावाच्या शीख व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. पेशावरच्या काक्षल भागात हा हल्ला झाला.

    34 वर्षीय मनमोहन ऑटो रिक्षाने घरी जात होते. ऑटो एका चौकात थांबवण्यात आला आणि जवळून सिंग यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी तपासाच्या नावाखाली काही लोकांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

    काही वृत्तांत असे म्हटले आहे की पोलिसांना परिसरात बसवण्यात आलेल्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळाले आहे. त्याआधारे तपास सुरू आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत फारशी माहिती दिलेली नाही.

    हिंदू डॉक्टरची हत्या

    या वर्षी मार्चमध्ये कराचीमध्ये हिंदू डॉक्टर बिरबल गेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नेत्रतज्ज्ञ गेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला टार्गेट किलिंग म्हटले आहे.

    यानंतर कराचीतच आणखी एका हिंदू डॉक्टरची हत्या करण्यात आली. 60 वर्षांचे डॉ. धरमदेव राठी हे त्वचारोग तज्ज्ञ होते. त्यांचा ड्रायव्हर हनिफ लेघारी याने त्यांची हत्या केली होती, त्यानंतर तो पळून गेला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी डॉ. धरम देव यांनी त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी केली होती. त्याचा चालक हनिफ याला याचा राग आला आणि त्याने घरी परतत असताना डॉक्टरचा गळा दाबून खून केला.

    Attacks on Sikhs increase in Pakistan, India summons PAK High Commission Ambassador, demands inquiry and report

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते