• Download App
    ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि...’’ फडणवीसांचा थेट निशाणा! Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized NCP

    ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!

    ‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीत नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्यांचे वाटप केले गेले, यामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं गेल्याचे दिसून आले, यावरून फडणवीसांनी निशाणा साधला आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized NCP

    फडणवीस म्हणतात, ‘’राष्ट्रवादीत ओबीसी नेते नाहीत, असे मी म्हटले नाही. राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि संवैधानिक पदे द्यायची वेळ आली की त्यांना ओबीसी दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते खासगीत जे बोलतात तेच मी जाहीरपणे बोललो, ते कदाचित पवारांना आवडले नसेल.’’ तसेच,  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिका अधिकार्‍यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की, ‘’कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्यावर आम्ही कारवाई करु.’’

    याशिवाय, ‘’भारताला राजकीय स्वातंत्र हे 15 ऑगस्ट 1947 रोजीच मिळाले, हे सत्य आहे. पण, अखंड भारत हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. पण, अखंड भारताचे स्वप्न पाहणार्‍यांनाही स्वातंत्र्यांची तारीख बदलता येणार नाही.’’, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    याचबरोबर, ‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ हा औरंगजेबाने केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. धर्म बदलण्यासाठी दबाव आल्यानंतर त्यांनी अत्याचार सहन केले पण, त्यांनी ती मागणी मान्य केली नाही. हा इतिहास उभ्या जगाला माहिती आहे, तो बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.’’, असेही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवले.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा